मुंबई | कोरोनचा धसका सगळ्यांनीच घेतलाय तसा तो लोकप्रतिनिधींनी देखील घेतला आहे. भाजप आमदार योगेश सागर यांनी आज मास्क घालून विधानभवनात प्रवेश केला.
मास्क आणि हातात सॅनिटायझर घेऊन त्यांनी विधानभवनात प्रवेश केला. भितीमुळे नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी मी मास्क आणि सॅनिटायझर घेऊन आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
कोरोना व्हायरसमुळे विधानसभेचं कामकाज किती दिवस घ्यायचं याचा निर्णय बिझनेस अॅडवायझरी विधानसभा घेईन, पण मी स्वत:ची काळजी घेण्यासाठी आणि खास करून जनजागृती करण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरतो आहे, असं योगेश सागर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात एकूण 11 कोरोनाबाधित रूग्ण सापडले आहेत. त्यापैकी पुण्यात 9 तर मुंबईत 2 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
ट्रेंडिंग बातम्या-
“आडनाव गांधी असल्यावर राहुल नावाचा नेताही राष्ट्रीय अध्यक्ष होण्यास पात्र ठरतो”
कोरोनाच्या बातम्या बघून स्वत:ला घरात कोंडून घेतलं, दोघांवर मानसिक उपचार सुरु
महत्वाच्या बातम्या-
खडसेंच्या पदरी पुन्हा निराशा… राज्यसभेचं तिकीट नाकारलं; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…
निष्ठावंतांना डावलत शिवसेनेकडून राज्यसभेसाठी प्रियांका चतुर्वेदींना उमेदवारी
खडसेंच्या पदरी पुन्हा निराशा… राज्यसभेचं तिकीट नाकारलं; त्यावर नाथाभाऊ म्हणतात…
Comments are closed.