बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

युती नाही पण समझोता! आगामी निवडणुकांसाठी भाजप-मनसेचं गणित ठरलं

मुंबई | आगामी निवडणुकांसाठी सध्या राजकीय वर्तुळात हालचाली पहायला मिळत आहे. यातच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये युती होणाच्या चर्चाही जोरदार रंगल्या आहेत. अशातच आता दोन्ही पक्षांमध्ये जागांबाबत समझोता झाल्याचं माहिती समोर आली आहे.

मनसे आणि भाजप युतीच्या चर्चा रंगलेल्या असतानाच आता पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी भाजपा-मनसे एकत्र आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपा-मनसेमध्ये थेट युती झाली नसली तरी आम्ही जागांसंदर्भात चर्चा केली असून जागा व्यवस्थापनाबद्दल दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली असल्याचं केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार कपील पाटील यांनी सांगितलं आहे.

ज्या भागात भाजपचा दबदबा आहे तिथे मनसेनं उमेदवार द्यायचा नाही आणि जिथे मनसेचा बोलबाला आहे तिकडे भाजपने आपला उमेदवार द्यायचा नाही, असा समजोता करण्यात आला आहे. माध्यमांशी बोलताना कपील पाटलांनी ही माहिती दिली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या 15 जागांसाठी 74, तर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी 70 अर्ज कायम आहेत. आता रंगलेल्या युतीच्या चर्चांत केलेला हा समझोता किती खरा उतरतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –  

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की…”

‘लाच घेणं काही चुकीचं नाही, सगळीकडेच भ्रष्टाचार चालतो’; भाजप आमदार बरळल्या

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं; ‘या’ तारखेला होणार मतदान

चालकाच्या धाडसाने प्रवाशांचा जीव धोक्यात, पुलावरून जाताना एसटी कोसळली; पाहा व्हिडीओ

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More