बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप-मनसे युतीचा श्रीगणेशा! ‘या’ जिल्ह्यात अखेर युतीची अधिकृत घोषणा

पालघर | राज्यात बऱ्याच दिवसांपासून भाजप आणि मनसे युतीची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर मनसे भाजप युतीबाबत तर्क-वितर्क लढवले जात होते. आता प्रत्यक्षात मनसे आणि भाजपची युती पहायला मिळत आहे.

पालघर जिल्हात पंचायत समिती पोट निवडणुकीसाठी मनसे आणि भाजपची पहिलीचं युती झाली आहे. त्याबाबत पालघरचे भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मनसेने हिंदुत्त्वाचा मुद्दा स्वीकारला. हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून राज्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजप युती होण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुणे जिल्हात देखील महापालिका निवडणुकांसाठी मनसे आणि भाजप युती व्हावी, अशी मनसेच्या स्थानिक नेत्यांची इच्छा आहे. या युतीमुळे पक्षाला फायदा होईल असं काही मनसे नेत्यांच म्हणणं आहे. त्यामुळे भाजपसोबत युती करण्याची मागणीचं स्थानिक नेते आपल्या पक्ष नेतृत्त्वाकडे करत आहेत.

दरम्यान, मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये पुढील काळात युती होणार का नाही? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे पुण्यातील भाजपसोबतच्या युतीबाबत राज ठाकरे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसला मोठा धक्का! माजी मुख्यमंत्र्याने ठोकला काँग्रेसला रामराम

“देशात ‘ही’ नवी पद्धत आलीये, काहीजण सुुपारी घेऊन काम करतात”

“अडसूळांना अटक होताच आजारी पडले, आता मुश्रीफांना कोणीच वाचवू शकत नाही”

“सरकार ‘त्या’ गोष्टींवर विचार करायला तयार, शेतकऱ्यांनो आंदोलन मागे घ्या”

‘भारत बंद’ दरम्यान दिल्ली-हरियाणा सीमेवर शेतकऱ्याचा मृत्यू; पोलिसांनी सांगितलं ‘हे’ कारण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More