“राहुल गांधींच्या जिभेला चटके द्यायला हवे”; भाजप खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

Anil Bonde | कॉँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे देशभरात भाजपकडून आंदोलन करण्यात आलं. भाजपने त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. याचदरम्यान, शिवसेना नेते संजय गायकवाड यांनी, जो राहुल गांधीची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचे बक्षीस दिलं जाणार, असं वादग्रस्त विधान केलं होतं. यामुळे बराच वाद झाला होता. अशात भाजपच्या एका खासदाराने राहुल गांधी यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. (Anil Bonde )

‘राहुल गांधींची जीभ छाटू नये,त्यांच्या जिभेला चटके द्यायला हवे’ असं वादग्रस्त वक्तव्य भाजप खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे. या वक्तव्यामुळे आता आणखी वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यांच्या या वक्तव्याने एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले अनिल बोंडे?

संजय गायकवाड यांनी जीभ छाटण्याची केलेली भाषा बरोबर नाही. परंतु राहुल गांधी आरक्षणासंदर्भात जे बोलले ते अतिशय भयानक आहे. विदेशात जाऊन वात्रटासारखं कोणी बोलत असेल तर त्यांची ‘जीभ छाटू नये जिभेला चटके मात्र दिले पाहिजे’ अशा लोकांच्या जिभेला चटके देणे आवश्यक आहे, असं वक्तव्य खासदार अनिल बोंडे यांनी केलं आहे.

“देशातील बहुसंख्यांकांच्या भावना जे दुखावतात त्या लोकांना किमान जाणीव तरी करून द्यायला हवी म्हणून ‘जीभ छाटू नये तर जिभेला चटके’ मात्र निश्चितच दिले पाहिजे.”, असं अनिल बोंडे (Anil Bonde ) यांनी म्हटलं. त्यांचं हे वक्तव्य आता चर्चेत आलं आहे.

संजय गायकवाड काय म्हणाले होते?

बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील राहुल गांधी यांच्याबद्दल असंच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. जो राहुल गांधीची जीभ छाटेल, त्याला तब्बल 11 लाखांचं बक्षीस दिलं जाईल, असं आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मागासवर्गीय, आदिवासींसह इतरांचे शंभर टक्के आरक्षण संपवायचं आहे. असा आरोप देखील संजय गायकवाड यांनी केला होता.

याशिवाय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी आरक्षण संपवण्याची भाषा करून त्यांच्या मनातील गोष्ट ओठावर आली असल्याचं आमदार  गायकवाड म्हणाले होते. त्यानंतर आता खासदार अनिल बोंडे (Anil Bonde ) यांचं विधान चर्चेत आलं आहे.

News Title- BJP MP Anil Bonde criticised Rahul Gandhi

महत्वाच्या बातम्या-

आजचा दिवस संकटांचा, पदोपदी राहावं लागणार सावध;.. ही रास तुमची तर नाही?

पुण्यात भाजपला मोठा झटका, माजी आमदाराने केला शरद पवार गटात प्रवेश

रेल्वेत होतेय बंपर भरती, तरूणांनो सरकारी नोकरीची संधी गमावू नका!

आज ‘या’ राशींवर राहील स्वामींची अपार कृपा, आर्थिक चणचण संपणार!

पुण्यात गणपती मिरवणुकीला येताय? तर या ठिकाणी करा गाड्या पार्क, मेट्रोचं काय?