बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“हाच माज गांधी खानदानाला होता शेवटी त्यांना वायनाड शोधावं लागलं”

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आतापासूनच आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याची सुरूवात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीपासून केली आहे.

राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यासंबधी ट्विट केलं होतं. एकवेळ सुर्य पश्चिमेला उगवेल मात्र बारामतीत पवारांचा पराभव होणं शक्य नाही, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant patil) यांनी म्हटलं होतं. या ट्विटला भाजप (BJP) आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत प्रत्युतर दिलं आहे.

अतुल भातखळकरांनी (Atul Bhatkhalkar) त्यांच्या ट्विट्ला प्रत्युत्तर दिलं आहे. हाच माज गांधी खानदानाला अमेठीबाबत होता शेवटी त्यांना वायनाड शोधावं लागलं. तुम्हीही शोधून ठेवा, असा टोला अतुल भातखळकरांनी लगावला आहे.

यावर पाटलांनी अजूनतरी कोणतं उत्तर दिलं नाही. भाजप आणि मविआ (MVA) यांचा वाद अजून तीव्रतेने होणार असल्याची शक्यता समोर आहे.

थोडक्यात बातम्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More