महाराष्ट्र मुंबई

रोटन टाटा असा उल्लेख करत सुब्रमण्यम स्वामी यांची रतन टाटांवर टीका, म्हणाले…

मुंबई | नव्या संसद भवनाबाबत सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. नव्या संसद भवनाला कोर्टाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या नव्या संसद भवनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे लवकरच याचं काम सुरु होणार आहे. या निकालावर भाजप भाजप सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीला या प्रकल्पाचं कंत्राट मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

नवीन संसद भवनाची इमारत उभारण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचं मी स्वागत करतो. भारतामधील सर्व महत्वाच्या ठिकाणांवरुन ब्रिटीशांच्या खूणा पुसून टाकत त्याऐवजी स्वतंत्र भारतात उभारलेल्या इमारती पहायला मला आवडेल. मात्र या इमारतीचे कंत्राट रोटन टाटा यांना मिळालं, हे मला मान्य नाही, असं ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ तारखेपासून देशात कोरोना लसीकरणाला प्रारंभ!

ममता बॅनर्जींना मोठा धक्का; क्रीडामंत्री लक्ष्मी रतन शुक्ला यांचा राजीनामा

रोहित पवारांचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र; केली ‘ही’ विनंती

…तर राज्य सरकार गरिबांना मोफत लस देणार- राजेश टाेपे

…तर मी तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या