जयपूर | आम्ही प्रभू श्रीराम यांचे पुत्र कुश यांचे वंशज आहोत. आमच्याकडे या सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा भाजपच्या खासदार आणि जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी दिया कुमारी यांनी केला आहे. प्रभू श्रीराम यांचे वंशज पूर्ण जगात परसलेले आहेत. त्यांच्या वंशजांपैकीच आम्ही आहोत, असं त्यांनी म्हटलं आहे.
राम जन्मभूमी प्रकरणाची सुनावणी सध्या सर्चोच्च न्यायालयात सुरू आहे. प्रभू रामाचे वंशज अयोध्येत किंवा जगातील कोणत्या कोपऱ्यात आहेत का? असा प्रश्न रामलल्लाच्या वकिलांना विचारण्यात आला होता. यावर माहिती घेऊन उत्तर देऊ, असं स्पष्टीकरण वकिलांनी दिलं होतं. यातच आम्ही प्रभू श्रीराम यांचे वंशज आहोत, असा दावा कुमारी यांनी केला आहे.
जयपूरमधील राजघराणे प्रभू श्रीरामाचे वंशज आहे. याबाबतचे वंशावळी आणि दस्ताऐवज आमच्याकडे आहेत, असं दिया कुमारी यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितलं.
दरम्यान, दिया कुमारी यांच्या दाव्यावर आता जोरदार चर्चा झडण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘ऐ… चूप बसायचं’; मदतीची मागणी करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटलांची दमबाजी
-पूरग्रस्त महिलांना 45 हजार सॅनिटरी नॅपकिन्सची पॅकेट्स देणार- पंकजा मुंडे
-बॉलिवूडकरांनी हात आखडता घेतला मात्र रितेश- जेनेलियाची पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत!
-“पुलवामा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च रिलायन्स करेल”
-सांगली कोल्हापूरात नियोजन चुकलं असं म्हणता येणार नाही- गिरीश महाजन
Comments are closed.