बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वैश्विक नेता असल्याचा दावा फोल, मोदींची लाट ओसरली’; ‘या’ भाजप खासदाराचा मोदींना घरचा आहेर

नवी दिल्ली | भाजप सध्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तयारीत आहे. भाजप सर्व नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील या रणधुमाळीत उतरले आहेत. एकीकडे भाजपचे नेते मोदींचा उदोउदो करताना दिसतात तर दुसरीकडे भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे.

मोदी सत्याच्या क्षणापर्यंत पोहोचले आहेत. भारत देशाचे नेतृत्व करणारे वैश्विक नेते असल्याच्या दाव्यातील हवा निघून गेली आहे. आता QUAD आणि BRICS यापैकी एकाची निवड मोदींनी केली पाहिजे. अन्यथा त्यांचा शेवट पंचतंत्रातील गोष्टीतल्या वटवाघुळाप्रमाणे होईल, असं ट्विट करत सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदींना टोला लगावला आहे.

QUAD मध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे देश आहेत. याची मिटींग येत्या 12 मार्चला होणार आहे. यात चारही देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार आहेत. हिंद-पाॅसिफिक प्रदेशातील प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होत असतात. तर मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक प्रदेशातील मुद्यांवरून यात चर्चा होत असतात.

दरम्यान, सुब्रमण्यम स्वामी यांनी याआधीही वेळोवेळी आपली भुमिका मांडत मोदींवर टीका केली आहे. त्यात त्यांनी बऱ्याचदा भाजपला घरचा आहेर दिला आहे.

पाहा ट्विट-

 

थोडक्यात बातम्या-

‘शेतकऱ्याची लाखमोलाची जमीन…’; नाना पटोलेंचा रामदेवबाबा अन् अंबानींना संतप्त सवाल

“सचिन वाझे ठाकरे सरकारचा जावई आहे का?”

महिलांवरील शारीरिक आणि लैंगिक अत्याचाराबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर

देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग दाखल!

‘ही माझी मोठी चूक’; राहुल गांधींच्या या वक्तव्याने चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More