बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंची राज्यपालांकडे मागणी

मुंबई | ठाकरे सरकार कोरोना संकट हाताळू शकत नाही. या सरकारची क्षमता नाही. हे सरकार कोरोनाचा सामना करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे राज्यपालांनी या सरकारला नारळ देऊन राष्ट्रपती राजवट आणावी, अशी मागणी भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांकडे केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार चालवण्यात सक्षम नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत. कोरोनामुळे राज्यावर गहिरं संकट आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

आतापर्यंत जे काही दिलंय ते केंद्र सरकारने दिलं आहे. हे कुठल्या प्रकारचे राजकारण आहे हे न समजण्यापलिकडे आहे. या सरकारचा अभ्यास नाही, सरकारी अधिकाऱ्यांना कसं हाताळावं, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना संरक्षित कसं ठेवावं याचा अभ्यास नाही. त्यामुळे असा कारभार सुरु आहे, असंही राणे म्हणाले.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत आहे. रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत. राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावं आणि महाराष्ट्रात-मुंबईत होणारे मृत्यू थांबवावेत, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागितली केरळ सरकारकडे ‘ही’ महत्त्वाची मदत

कामगारांच्या मदतीला अभिनेत्री माधुरी दिक्षीत धावली

महत्वाच्या बातम्या-

आमच्या विरोधात काही करण्याची हिंमत केली तर…; पाकिस्तानची भारताला धमकी

पियुषजी, राज्यसभेत आपण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करताय विसरु नका- संजय राऊत

…म्हणून शरद पवारांनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More