बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कब्बडी खेळताना, नाचताना दिसल्या प्रज्ञा सिंह ठाकूर; सोशल मीडियावर केलं जातंय ट्रोल, पाहा व्हिडीओ

भोपाळ | भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्यामुळे चर्चेत असतात. आता प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकामध्ये त्या कार्यक्रमात गरबा खेळत आहेत तर एकामध्ये त्या कब्बडी खेळत आहेत. अनेकांनी त्यांना या व्हिडीओजवरून सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वीच व्हिलचेअरवर असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर एकदम नाचू कशा लागल्या? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला आहे.

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका स्वाती चतुर्वेदी यांनी ट्विटरवर प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा गरबा खेळतानाच व्हिडीओ शेअर करत प्रज्ञा सिंह यांना नाचताना पाहणं एक चमत्कारच आहे, असा टोला लगावला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे, “ओ माय गोडसे, दहशतवादाचा आरोप असणाऱ्या प्रज्ञा सिंह ठाकूर सिंह काही दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने कोर्टातही येवू शकत नव्हत्या. मात्र आता त्या नाचत आहेत. हा एक चमत्कारचं आहे”, असा टोला त्यांनी लगावलाय.

तर दुसरीकडे त्यांचा महिला खेळाडूंसोबत कब्बडी खेळतानााचा व्हिडीओ समोर आलाय. त्या देवीच्या दर्शनासाठी एका कार्यक्रमात गेल्या होत्या. त्यावेळी त्या ठिकाणी महिला कब्बडी खेळाडूही उपस्थित होत्या. प्रज्ञा ठाकूर यांनी त्या खेळाडूंशी बोलून त्यांचं कौतुक करून खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. त्यानंतर त्या खेळाडूंनी प्रज्ञा ठाकूर यांना त्यांच्यासोबत कब्बडी खेळण्याची विनंती केली. प्रज्ञा ठाकूर यांनीही ती विनंती मान्य करून त्यांनी खेळांडूसोबत कब्बडी खेळली होती. मात्र, त्यावरून त्या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.

कब्बडी खेळण्यावरूनही त्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आल्या आहेत. यावर युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांनी प्रज्ञा ठाकूर यांना एक खोचक सवाल विचारला आहे. त्यांनी प्रज्ञा ठाकूर यांचा कब्बडी खेळतानाचा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट करून म्हटलं आहे की, “यांची एनआयए कोर्टामध्ये पुढची सुनावणी कधी आहे?” प्रज्ञा ठाकूर या एकदा तब्येतीचं कारण देत कोर्टात अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यावरूनच श्रीनिवास यांनी हा टोला लगावला आहे.ॉ

पाहा व्हिडीओ

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय, इतर देशांनी कर्ज नाकारल्याने निघणार दिवाळं

ऑनलाइन मद्य खरेदी करणं महिलेला पडलं महागात, बसला लाखोंचा गंडा

आर्यन खानची कोठडी आज तरी संपणार का? जामीन अर्जावर आज परत सुनावणी

तेजस ठाकरे यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला राजकारणात प्रवेश करणार?

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्तब?

 

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More