भोपाळ | काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत. दोन देशांचं नागरिकत्व असलेल्यांकडून आपण देशभक्तीची अपेक्षा करु शकत नाही, असं म्हणत भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर टीका केली आहे.
परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असू शकत नाही, असा घणाघातही साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. त्या भोपाळमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर बोलत होत्या.
काँग्रेसचं सरकार असताना नऊ वर्षे तुरूंगात होते. या काळात तुरूंगात छळ करण्यात आला. त्यामुळे मला अनेक गंभीर दुखापती झाल्या, ज्या अजूनही कायम आहेत. अनेक जुन्या व्याधीही आता बळावल्या आहेत. या सगळ्या छळामुळे माझी नजर कमी झाली असून मेंदू व डोळ्यात सूज आली आहे, असं साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्यावर काँग्रेसनेही प्रतिक्रिया दिली आहे. मध्य प्रदेश काँगेस प्रवक्ता जे पनी धनोपिया यांनी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मानसिक तोल ढासळला असल्याचं म्हटलं आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसमध्ये ना सभ्यता आहे ना संस्कार आहेत- साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर
‘जिथे भ्रष्टाचार दिसेल तिथे लाथ मारणारच’; मनसेचा शिवसेनेला इशारा
“परदेशी महिलेच्या पोटी जन्मलेली व्यक्ती देशभक्त असूच शकत नाही”