हिंदूंनो शस्त्रं बाळगा, लवकरच हिंदूराष्ट्र बनणार- भाजप आमदार

हैदराबाद | तेलंगाणाचे भाजप आमदार राजा सिंह यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय. हिंदूराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रत्येक हिदूने आपल्याजवळ शस्त्र बाळगायला हवी, असं त्यांनी म्हटलंय. 

जो व्यक्ती हिंदू राष्ट्राच्या मध्ये येईल त्याचं नामोनिशाण मिटवलं जाईल. मी तुम्हाला आश्वासन देतो की हिंदूराष्ट्र बनणारच आणि त्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागेल, असं राजा सिंह यांनी म्हटलंय. 

दरम्यान, प्रत्येक हिंदू तलवारबाजी शिकावी, तसेच स्वतःसोबत आणि घरात शस्त्रास्त्रं बाळगावी, असा धक्कादायक सल्लाही त्यांनी दिलाय. आपली मतं पक्षाशी संबंधित नसून वैयक्तिक असल्याचं त्यांनी सांगितलंय.