बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसे म्हणाल्या…

मुंबई | रावेर मतदारसंघातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या अधिकृत वेबासाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. हा सर्व गोंधळ गुगल भाषांतरामुळे निर्माण झाल्याचं चित्र समोर येत आहे. यावर रक्षा खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

झालेला प्रकार हा वाईट आणि विचित्र होता. एका महिलेच्या संदर्भात कोणी विरोधक किंवा सत्ताधारी असेल अथवा तिथे कुणीही असेल त्यांनी हे व्हायरल करण्याची कोणतीही गरज नव्हती, असं रक्षा खडसे यांनी म्हटलं आहे.

एका महिला म्हणून एका खासदारावर तुम्ही प्रश्नचिन्ह उपस्थितीत केलं आहे. त्यामुळे दु:ख वाटलं, असं रक्षा खडसे यांनी सांगितलं. या प्रकरणावर पोलीस चौकशी करत आहे. पक्ष सुद्धा यावर खुलासा करणार आहे. जे कोणी दोषी असतील त्यावर नक्की कारवाई केली पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली आहे.

दरम्यान,  माझ्याकडे जे मेसेज आले आहे. त्यामध्ये ‘सेव्ह महाराष्ट्र फॉर्म बीजेपी’ या पेजवरून याचे स्क्रीन शॉट शेअर करण्यात आले आहे. हे पेज कोण चालवत आहे, ते माहिती नाही. या पेजवरून ही बातमी व्हायरल करण्यात आली असल्याचा आरोप खडसेंनी केला.

 

थोडक्यात बातम्या-

रक्षा खडसेंचा वादग्रस्त उल्लेख; गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर भाजपनं चूक सुधारली

येत्या 24 तासात महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता- हवामान विभाग

” शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवणाऱ्या सरकारला जाब विचारणारे कोणी आहे की नाही?”

“मुंबई पोलीस अर्णबला लवकरात लवकर अटक करतील, असा आम्हाला विश्वास”

आतापर्यंतची सर्वात स्वस्त SUV आज होणार लाँच; किंमत आहे फक्त…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More