दलित आणि मनुवाद्यांचे गुलाम होते हनुमान; भाजप खासदाराचं खळबळजनक वक्तव्य

लखनऊ | हनुमानाच्या जातीवरुन सुरु झालेला वाद काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता हनुमान दलित आणि मनुवाद्यांचे गुलाम होते, असा दावा भाजप खासदार सावित्रीबाई फुले यांनी केला आहे. 

सावित्रीबाई फुले उत्तर प्रदेशच्या बहराईचमधून भाजपच्या खासदार आहेत. वादग्रस्त वक्तव्य आणि भाजपवर टीका करण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. 

योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाच्या जातीचा मुद्दा उकरुन काढला होता. त्यांनी हनुमान दलित होता, असं म्हटलं होतं. 

त्यानंतर हनुमान आदिवासी, आर्य, जैन असल्याचा दावा अनेकांनी केला होता. आता सावित्रीबाई फुले यांच्या नव्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता कितीही वेळा काढा एटीएममधून पैसे; स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर  

-कांदा विकून मोदींना पाठवली होती मनी आॅर्डर; त्याला मिळाला ‘हा’ प्रतिसाद

-माझं नशीब देशातील सव्वाशे कोटी जनतेच्या हातात- नरेंद्र मोदी

-दंगलीची माहिती असेल तर पोलिसांना द्या; शिवसेनेनं राज ठाकरेंची उडवली खिल्ली

-मीही शरद पवारांना भेटणार होतो- दीपक केसरकर