सोलापूर | सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांच्या बेडा जंगम जात प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. यावेळी खासदारांच्या वकिलांनी दिलेले 12 अर्ज जात पडताळणी समितीने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे जयसिध्देश्वर यांची खासदारकी जाण्याची शक्यता आहे.
बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. आता टपालाद्वारे पडताळणी समितीने निकाल पोहच करणार आहे. जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामीजींनी तक्रारदारांने आक्षेप घेतलेली मूळ कागदपत्रे दिले नाहीत.
खासदार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांनी लिंगायत समाजातील बेडा जंगम असल्याचे जात प्रमाणपत्र निवडणुकीवेळी दिले होते. यावर आक्षेप घेत प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जात पडताळणी समितीने दाखला तपासावा आणि खासदारांचे प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली होती.
निकालानंतर हा खटला बंद झाला असून आगामी आठ दिवसात पडताळणी समिती निकाल जाहीर करणार आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
शंभूराजेंच्या समाधीवर माथा टेकवताच अमोल कोल्हेंना अश्रू अनावर!
इंदुरीकर प्रकरण: मला अश्लील शिवीगाळ होत असताना महिला नेत्या गप्प का?- तृप्ती देसाई
महत्वाच्या बातम्या-
“महाराज तुम्ही खचू नका, तुमच्यासोबत संपूर्ण महाराष्ट्र”
“महाराज कीर्तन सोडू नका, स्त्रियांचा आदर करायला शिकवा”
महाविकास आघाडीतील मतभेदांमुळेच सरकार पडेल- एकनाथ खडसे
Comments are closed.