बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

नवी दिल्ली | नुकताच देशात कृषी (Agriculture Laws) कायदे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ( PM Narendra Modi ) देशभरातून टीका करण्यात आली. कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय आधीच घेतला असता तर आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांचा जीव वाचला असता. अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली होती. त्यातचं आता भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी (MP Subrmanyam Swammy) यांनींही मोदी सरकारच्या कामकाजावर टीका केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विटमध्ये मोदी सरकार सर्वच बाबतीत नापास झालं असल्याची टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये मोदी सरकारच्या कामाचा अहवाल असं म्हणत पुढे अर्थव्यवस्थेत नापास, सीमा सुरक्षेत नापास असं म्हटलं आहे. पुढे त्यांनी परराष्ट्र धोरणापुढे अफगाणिस्तान गोंधळ तर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यासमोर त्यांनी पेगॅसस सुरक्षेचा उदाहरण देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे त्यांनी ट्विटमध्ये  आतंरराष्ट्रीय सुरक्षेवरून काश्मिर विषाद असं म्हणत ताशेरे ओढले आहेत. शिवाय त्यांनी ही सर्व टीका करून शेवटी या सर्वाला जबाबदार कोण? तर सुब्रमण्यम स्वामी असं म्हणत टोला लगावला आहे. याआधीही त्यांनी अनेकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. याशिवाय त्यांनी यापूर्वीच्या एका ट्विटमध्ये विरोधी नेतांच्याही टीका केली होती.

त्यांनी यावेळी ट्वीटमध्ये ममता बॅनर्जी, मोरारजी देसाई, राजीव गांधी, चंद्रशेखर यांचे कौतुक केलं होतं. शिवाय यावेळी कौतुक करताना त्यांनी हे असे नेते आहेत ज्यांच्याकडे एक खुप विशेष गुण आहे तो म्हणजे ते जे बोलतात ते करून दाखवतात. असं ट्विट करत त्यांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना टोला लगावला होता. त्यानंतर त्यांनी केलेलं हे ट्वीट विशेष चर्चेत आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मी मोदींच्या टीमचा भाग झालोय, आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात…”

समीर वानखेडेंचं टेंशन वाढलं; ‘ती’ कागदपत्रं शेअर करत नवाब मलिकांचा खळबळजनक दावा

झटपट वजन कमी करायचंय? मग ‘हे’ 4 चमचमीत पदार्थ करू खा… होतील फायदेच फायदे

अजिंक्य रहाणेची कसोटी! भारताला ‘या’ 5 किवी खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

ममता बॅनर्जी घेणार ठाकरे-पवारांची भेट; राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More