सातारा | ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.
साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आलं आहे. त्याचं आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे. यावेळी उदयनराजे भोसले बोलत होते.
मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी फटकेबाजी उदयनराजे यांनी केली.
काम करताना एक लक्षात घ्य, थोडा त्रास होणार. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात… त्रास तर होतोच. त्रास झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत हे तर ग्रेड सेपरेटर आहे, थोडा त्रास तर होणारच, असं उदयनराजे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
मुलीचा धक्कादायक पराभव पण भास्कर पेरे पाटलांना नाही खंत, कारण…
“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”
“मी मोदी सरकारला घाबरत नाही हे लोक मला हात लावू शकत नाहीत पण…”
“काँग्रेस वारंवार चीनसमोर गुडघे का टेकतं?”