नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे आणखी एक शिवाजी महाराज आहेत, असं म्हणत भाजप खासदार विजय गोयल यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे.
ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी वाईट शक्तींविरोधात लढाई केली होती. तसेच दहशतवाद आणि भ्रष्टाचाराविरोधात मोदींची लढाई निरंतर आहे, असं विजय गोयल यांनी सांगितलं आहे.
370 कलम रद्द केल्यानंतर सभागृहात चर्चेदरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विजय गोयल यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. कलम 370 हटवणं हा एक धाडसी निर्णय आहे, असं विजय गोयल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मोदी सरकारने 370 कलम रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला. यामुळे त्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-…आणि मुख्यमंत्रीपदही भाजपकडेच असेल- चंद्रकांत पाटील
-येत्या काळात फक्त पवार कुटुंबंच राष्ट्रवादीत राहिल; मुख्यमंत्र्यांची बोचरी टीका
-“कलम 370 देशाशी केलेला विश्वासघात होता; अखेर हा कलंक मिटला”
-नितेश राणेंनी केलं मोदींच सरकारच्या निर्णयाचं कौतुक
-राखी सावंतने वयाच्या 40व्या वर्षी केलं लग्न!
Comments are closed.