बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“वडिलांना वचन दिलं म्हणून दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं”

मुंबई | फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपला डच्चू देत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. त्यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे शपथविधी उरकून घेतला आणि महाराष्ट्राला मोठा धक्काच दिला होता. (Morning swearing in Ajit Pawar Devendra Fadnavis) आज या पहाटेच्या शपथविधीला 2 वर्ष पुर्ण होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र चढवलं होतं.(Vinayak Sahastrabuddhe criticizes Mahavikas Aghadi) भाजप खासदार विनायक सहस्त्रबुद्धे यांनी महाविकास आघाडीवर टीकेची झोड उठवत ‘महाविनाश आघाडी’ म्हटलं आहे. ही दोन वर्ष भ्रष्टाचाराची राहिली आहेत. एखादी आपत्ती कोसळावी, तसं हे सरकार कोसळंय, अशी टीका सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.

शिवसेनेनं आरे कार शेडप्रमाणे हिंदूत्वाची भूमिका देखील बदलली आहे. वडिलांना वचन दिलं म्हणून त्यांनी दुसऱ्याचं मुख्यमंत्रिपद घेतलं, अशी घणाघाती टीका देखील विनायक सहस्त्रबुद्धे यांनी केली आहे.

राज्य सरकारची जनतेशी बांधिलकी नाही. सत्तेचं व्यस्न लागलेलं त्रिकुट निर्माण झालंय. सरकारच्या त्रासातून जनतेची कधी सुटका होणार असं आता जनता विचारत आहे, अशी टीका देखील विनायक सहस्त्रबुद्धे यांनी यावेळी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

सावधान, नव्या फंगसमुळे 2 डॉक्टरांचा मृत्यू, आधीच्या तुलनेत मृत्यूचा धोका जास्त

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी मिळणार पैसे

तिकडं राष्ट्रवादीचं कार्यालय फुटलं, इकडं ‘ओ शेठ’ गाण्यावर तुफान डान्स

“लग्न झालं, अजित पवार 48 तासांसाठी नवरदेव झाले अन् नवरी…”

लहान मुलांसोबतचा ओरल सेक्स गंभीर गुन्हा नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More