देश

आजकाल मला पाहिलं तरी भाजपचे खासदार घाबरतात- राहुल गांधी

नवी दिल्ली | आजकाल भारतीय जनता पक्षाचे खासदार मला पाहून दोन पावलं मागं जातात. बहुतेक ते असा विचार करत असतील, की मी त्यांना मिठी मारेल, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले. ते दिल्लीत बोलत होते.

मी लालकृष्ण अडवाणी यांच्याशी असहमत असू शकतो, त्यांचा विरोध करू शकतो, भांडू शकतो पण त्यांचा द्वेष करण्याची गरज नाही. हां… मी त्यांना मिठी जरुर मारू शकतो, असंही ते म्हणाले.

दरम्यान, राहुल गांधींनी लोकसभेत अविश्वास ठरावावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेत तुम्ही द्वेषाचं राजकारण केलं तरीही मी तसं करणार नाही, असं सांगितलं होतं. 

महत्त्वाच्या बातम्या–

-टीकाकारांना चोख प्रत्युत्तर; विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दिला राजीनामा

-मराठा आंदोलनात अज्ञात आंदोलकांनी पेटवली एसटी

-शरद पवार मराठा आरक्षणाच्या बाजूनं किती दिवस राहतील? खात्री देता येत नाही!

-मराठा आरक्षणासाठी छावा संघटनेच्या जिल्हा प्रमुखाचा आत्मदहनाचा प्रयत्न

-मराठा आरक्षण मागितलं म्हणून शरद पवारांनी पक्षातून काढलं- शालिनीताई पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या