बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस, केले ‘हे’ धक्कादायक आरोप

नवी दिल्ली | भाजपचे उत्तर प्रदेशमधील खासदारकौशल कौशल किशोर यांच्या घरातील कौटुंबिक वाद चार भिंतींबाहेर पडला असून त्या वादाने आता नवीन वळण घेतलं आहे. कौशल यांच्या सुनेने घराबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समजत आहे. सून अंकिताने तिच्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

आत्महत्या करण्याआधीचा अंकिताचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे त्यामध्ये अंकिताने, मी कोणासोबत लढू शकत नाही कारण तुमचे वडील हे खासदार आहे. माझं कोणीच ऐकणार नाही. आजपर्यंत कोणीच तुम्हाला हात लावला नाही. मग मी कशी तुम्हाला मारू शकते, असं म्हणत आहे.

तुम्ही किती खोटं बोलत आहात. तुम्ही आणि तुमच्या घरचे मला जगू देत नाहीत. घराचं भाडं भरलं नाही, सिलिंडर नाही, मी काय खात असेल याचा कधी विचार केला का?, जर तुम्ही माझ्य़ाकडे येणार नसाल तर मला राहायचं देखील नाही. मी जातेय. तुम्ही नेहमीच माझी आठवण काढाल. माझ्या मृत्यूचं कारण तुम्ही आणि तुमच्या घरचे आहेत. मी जात आहे, असंही अंकिताने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अंकिताने आपल्या पतीवर म्हणजे कौशल किशोर यांचा मुलगा आयुष याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-  

काय सांगता! भर सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले रक्ताळलेले कपडे अन्….

सचिन वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला- संजय राऊत

‘हा’ आयपीओ बाजारात बुधवारी धडकणार; गुंणतवणुकदांरांंना मोठी संधी

‘माझा अभ्यास दांडगा, मला वनमंत्री करा’; संजय राठोडांच्या मतदारसंघातील शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

“लाॅकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना परवडणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More