बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भाजप खासदाराच्या सुनेचा थेट चाकणकरांना फोन, म्हणाल्या, ‘प्लीज ताई माझी सुटका करा’

मुंबई | भाजप खासदार रामदास तडस यांच्या सुनेने आपल्यावर कुटुंबाकडून अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. रामदास तडस यांच्या सुनेनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे मदत मागितली आहे. पूजा तडस यांनी एक व्हिडीओ शूट करत रूपाली चाकणकरांकडे मदत मागितली आहे.

रूपाली चाकणकरांनी पूजा तडस यांचा व्हिडीओ ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. हा व्हिडीओ रामदास तडस यांच्या सुनेचा असल्याचा दावा चाकणकरांनी केला आहे.

मला आज सकाळी लवकरच पूजाचा फोन आला. फोनवर त्या रडत होत्या. माझ्याकडे मदतीची मागणी त्या करीत होत्या. त्यानंतर मला त्यांनी सविस्तर प्रकरण सांगितलं. गेले अनेक दिवस रामदास तडस, त्यांचा मुलगा आणि तडस कुटुंबीय तिला मारहाण करत आहेत. तिच्या जीवाला धोका असल्याचं तिने मला सांगितलं. तसंच मला इथून घेऊन चला, अशी विनवणी तीने माझ्याकडे केली आहे, असं चाकणकरांनी सांगितलंय.

दरम्यान,राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्या मदतीसाठी तत्काळ रवान झाले आहेत. त्यांची सर्वोतोपरी मदत केली जाईल. यासंदर्भात नागपूर पोलीस आयुक्तांशी माझं बोलणं सुरु आहे. सरकार आणि पोलिसांच्या वतीने देखील तत्काळ अॅक्शन घेतली जाईल, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या- 

“तालिबानशी चर्चा करणारं मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांशी का बोलत नाही?”

“रोज बारामतीला नोटा पोहच करेल असा गृहमंत्री शरद पवार शोधतात”

राज्यात आज कुठे कुठे पाऊस होणार?, वाचा हवामान खात्याचा अंदाज

“तरीही मी कुणाला बलात्काऱ्याची बायको, बलात्काऱ्याची मुलं म्हणून हिणवणार नाही”

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक; अरुणा भाटियांचं उपचारादरम्यान निधन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More