‘यावर्षी योग्य माणसाच्या हस्तेच विठ्ठलाची पूजा’; भाजप खासदाराचं सूचक वक्तव्य
राहुरी | शिवसेनेचे नेते आणि बंडखोर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालंय. भाजप सुरुवातीच्या काळात या बंडातून अंगकाढूपणा करत होता. परंतु नंतर भाजप नेत्यांनी शिवसेनेला लक्ष करत टिका केली. आता भाजपचे नेते या प्रकारावर आपल्या सूचक प्रतिक्रिया देत आहेत.
राज्यात सुरु असलेले राजकीय वादळ थांबणार का? महाविकास आघाडी सरकार टिकणार का? याकडे वारकऱ्यांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंदा आषाढी एकादशीला विठ्ठलाची पुजा करणार की, सरकार पडून नवीन मुख्यमंत्री येऊन पुजेचा मान मिळवणार, याकडे वारकऱ्यांचं लक्ष लागलंय.
अहमदनगरचे भाजपचे खासदार डॉ. सुुजय विखे पाटील यांंनी यावर सूचक वक्तव्य केलं आहे. पाटील म्हणाले, पंढरीचा पांडुरंग नेहमी योग्य माणसाला पुजेसाठी बोलावत असतो. यावर्षीही योग्य माणसाच्याच हस्ते ही पूजा होईल. राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील संत महिपती महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरला प्रस्थान झाले. त्यावेळी सुजय विखे पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सर्व वारकऱ्यांमध्ये राजकीय घडामोडींची उत्सुक्ता आहे. यावेळी पाटलांनी त्यांच्याशी संवाद साधला. वारकऱ्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थीतीचा विचार न करता पांडूरंगाचा धावा करावा, असंही ते म्हणाले.
थोडक्यात बातम्या –
एकनाथ शिंदे दारुच्या नशेत?; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
‘आता तर ते दिसतही नाहीत’; बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
“देवा लवकर आटप रे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय”
“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”
‘आधी नाथ होते आता दास झालेत’, मुख्यमंत्र्यांची खोचक टीका
Comments are closed.