मुंबई | भाजपच्या काही आजी माजी खासदारांच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांचं येत्या लोकसभेच्या निवडणुकीत तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. त्यापैकी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.
खासदार रामदास तडस, माजी खासदार सुरेश वाघमारे, भंडारा-गोंदियाचे हेमंत पटले यांचं तिकीट कापण्याची शक्यता आहे.
वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांचे पुत्र सागर यांना यावेळी भाजपची वर्धा लोकसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावर्षी स्थानिक जातीय समीकरणांचा विचार करून भाजपातर्फे कुणबी समाजाला संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, पुणे लोकसभा मतदारसंघात अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आत्ताचे पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचं काय होणार? हा प्रश्न अनुत्तरितचं राहतो.
महत्वाच्या बातम्या-
-सांगलीमधून काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण लोकसभेच्या रिंगणात?
–“पक्षात राहून गडबड करणाऱ्यांना चून चून के मारूंगा”
–अखेर सलमान खान आणि कतरिना कैफचे होणार लग्न!
-“उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही”; मावळमधून पार्थ पवार लोकसभेच्या रिंगणात?
–भारताची खराब सुरुवात, कर्णधार पाठोपाठ धवन, शुभमनही बाद