उस्मानाबाद | मराठा क्रांती मोर्चामध्ये मुस्लीम समाजही मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरल्याचं चित्र आहे. मराठा आरक्षणासाठी भाजपच्या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्यानं चक्क आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
जुबेरपाशा शेख असं या मुस्लीम महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्या भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हाध्यक्ष होत्या.
भाजपकडून मराठा आणि मुस्लीम समाजाला अपमानास्पद वागणूक मिळत आहे. माझ्या बांधवांना होत असलेल्या त्रासामुळे शिवरायांचा एक मावळा म्हणून पक्षाच्या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी म्हटलंय.
@BJP4Maharashtra चा पदाधिकारी जुबेरपाशा शेख जिल्हाध्यक्ष:अल्पसंख्यांक युवा मोर्चा#मराठा_आरक्षण साठी राजीनामा दिला ही खरच कोतुकाची बाब आहे.#MarathaKrantiMorcha #मराठाक्रांतीमोर्चा #MarathaReservation pic.twitter.com/LpIORTvWNv
— रोहित देशमुख (@Rohit_D9999) July 26, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-पोलिसाने मोर्चेकऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप; सिंधुदुर्गात मराठा आंदोलन चिघळलं
-…म्हणून मराठा आमदारांनी दिलेले राजीनामे तूर्तास स्वीकारले जाणार नाहीत!
-माझ्यावर आरोप म्हणजे 6 फुटाच्या म्हशीला 16 फुटाचं रेडकू- छगन भुजबळ
-मराठा आरक्षणावरुन महापौरांसमोरील कुंडी आणि ग्लास फोडला
-कोणत्याही मराठी तरूणाने जीव गमावू नये; राज ठाकरेंची हात जोडून विनंती