Top News देश

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात नड्डा यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

कोरोनाची लक्षण दिसत असल्याने मी माझी कोरोना चाचणी केली. त्यानंतर माझा कोरोना चाचणीचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असल्याचं जे. पी. नड्डा यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्व सूचनांचं पालन करत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन नड्डा यांनी केलं आहे.

दरम्यान, दोन तीन दिवसांमागे जे. पी. नड्डा पश्चिम बंगालमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर काही हल्लेखोरांनी हल्ला केला होता. त्यावेळी नड्डा भाजप नेते कैलास विजयवर्गीय सोबत होते.

 


थोडक्यात बातम्या-

‘अवघ्या सात तासाच्या अधिवेशनात जनतेचे प्रश्न कसे मांडायचे?’; फडणवीसांचा सरकारला सवाल

…तर मुंबईत महापौर भाजपचा आणि उपमहापौर आरपीआयचा- रामदास आठवले

“मन खचून गेले हे बघून….त्या महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती बघायला मिळते”

कोरोनाने रायकर कुटुंबाचा केला पुन्हा घात; कुटुंबातील या व्यक्तिचं निधन

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणवीसांचा सरकारला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या