Top News देश

…ही सवय आता बदलली पाहिजे; ज्योतिरादित्य शिंदेंची शरद पवारांवर जोरदार टीका

नवी दिल्ली | देशात सध्या कृषी कायद्यावरुन अनेक चर्चा होताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त करताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी 2010 मध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रांमध्ये त्यांनी एपीएमसी कायद्याचा उल्लेख केला होता. पण आता ते आपल्याच वक्त्यावरुन मागे होत आहे. ही सवय आता बदलली पाहिजे. असं म्हणत ज्योतिरादित्य शिंदेंनी पवारांना टोला लगावला आहे.

शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात कृषी क्षेत्रात खासगी क्षेत्राची भागिदारी गरजेची असून यासाठी एपीएमसी कायद्याचे संशोधन झालं पाहिजे, असं सांगत ज्योतिरादित्यांनी शरद पवारांना आठवण करून दिली.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही पलटवार केला.

थोडक्यात बातम्या-

“शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्या सचिन तेंडुलकरचा ‘भारतरत्न’ काढून घ्या”

चुलता पंतप्रधान असताना भाजपनं पुतणीला तिकीट नाकारलं, वाचा सविस्तर!

विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडेच, या नेत्याची होऊ शकते निवड!

“बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर निवास ताब्यात घेणं आणि स्मारक न बांधणं याला टाईमपास बोलतात”

“जर शेतकरी हिंसक झाला तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या