देश

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनं मोदी-शहांची झोप उडाली!!

नवी दिल्ली | निवडणुका जवळ येत असल्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपनेही आपली ताकद जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा अंतर्गत सर्व्हे केला आहे.

या नव्या सर्व्हेतील निष्कर्ष भाजपची काळजी वाढवणारे आहेत. या सर्वेत भाजपला हिंदी पट्ट्यामध्ये 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विशेष म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये भाजपचं मोठं नुकसान होणार आहे. भाजपला 80 पैकी फक्त 20 जागांवर समाधान मानावं लागणार असल्याचं सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांची आघाडी झाल्याने भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 

महत्वाच्या बातम्या-

शरद पवारांनी माढा ऐवजी साताऱ्यातून लढावं- रामराजे नाईक

-कुलदीप यादवने निवडलंय नवीन प्रोफेशन, तुम्ही वाचाल तर चकीत व्हाल!

-राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच काँग्रेस सोडली, माजी परराष्ट्रमंत्र्याचा खुलासा

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

-राजकारणात खुनशी वृत्ती वाढीस लागलीय- एकनाथ खडसे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या