Top News राजकारण

शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक; निलेश राणेंचा टोला

मुंबई | धार्मिक स्थळं उघडण्यासाठी भाजपने अनेक आंदोलनं छेडली होती. त्यानंतर नुकतंच ठाकरे सरकारने धार्मिक स्थळं उघडण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रार्थनास्थळं सुरू केल्यामुळे कोरोना रूग्णांची संख्या वाढली असल्याचं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

त्यानंतर भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत अशी टीका त्यांनी केली आहे.

निलेश राणे म्हणाले, “सर्वात अगोदर दारूची दुकाने उघडली, दारुमुळे किती कोरोना रुग्ण बरे झाले अगोदर ती यादी जाहीर करा. शिवसेनेत सगळेच विद्वान एकापेक्षा एक आहेत.”

“दिवाळीत राज्यातील प्रार्थनास्थळं उघडल्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही मात्र, ती येण्यास वेळ देखील लागणार नाही”, असं विधान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

“कॉंग्रेस पूर्णपणे कोसळतेय; तिथे कुणीही माय-बाप उरला नाहीये!”

‘ही’ गोष्टी शिवसेनेच्या मूर्ख कार्यकर्त्यांना कधी समजणार?; काँग्रेस नेत्याची टीका

शाळा सुरु करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेणार- शिक्षणमंत्री

“मंत्रिपदाचा राजीनामा देऊन नितीन राऊतांनी बिल तपासणीसाठी इन्स्पेक्टर म्हणून बसावं”

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणाऱ्या दिंड्यांना पंढरपुरात परवानगी नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या