सिंधुदुर्ग । भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना आमदार राजन साळवी यांना खुलं आमंत्रण दिलं आहे. साळवी यांना पक्षात त्रास होत असेल तर त्यांना भाजपमध्ये यावं असं नितेश राणे म्हणालेत.
सध्या नाणारच्या मुद्द्यावरुन राजकीय फड रंगलाय. अशातच नाणार प्रकल्पामध्ये स्थानिकांचा विरोध मावळला तर महाविकास आघाडी सरकार पुढाकार घेईल, असं विधान राजन साळवी यांनी केलं. यामुळे साळवी पक्षात एकटे पडणार असल्याची चर्चा आहे.
अशातच साळवी यांना नितेश राणे यांनी निमंत्रण दिलंय. नितेश राणे म्हणाले, “नाणारच्या भूमिकेमुळे राजन साळवी यांना जर शिवसेनेत त्रास होत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये यावं. नाणार समर्थक आमदार म्हणून त्यांना निवडून आणू.”
दरम्यान या मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनीही ट्विटरद्वारे शिवसेनेवर आगपाखड केलीये.
थोडक्यात बातम्या-
चिंताजनक! कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ, पाहा सविस्तर आकडेवारी
आमदार निलेश लंके यांनी केलेल्या ‘त्या’ आवाहनाला मोठं यश!
सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यापुढे सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून करणार साजरा!
कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात!
‘शरद पवारांना आज मी पुन्हा सांगू इच्छितो…’; संभाजीराजे संतापले