Top News राजकारण

“थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात; ठाकरे सरकारचंही असंच झालंय”

मुंबई | कांजूरमार्ग कारशेडच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. भिंतीवर थुंकू नका असं लिहूनही लोकं तिथेचं थुंकतात, अशी परिस्थिती राज्य सरकारची झाली असल्याचं नितेश राणेंनी म्हटलंय.

कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत. या निर्णयानंतरल नितेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केलीये.

नितेश राणे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “काही भिंतींवर ‘थूकना मना है’ लिहिलेले असते..तिथेच लोक जास्त थुंकतात..ठाकरे सरकारचं तेच झालं आहे!!”

दरम्यान न्यायालयाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस यांनी, “आदित्य ठाकरे त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे किमान त्यांनी तरी सौनिक समितीचा अहवाल वाचावा. कांजूरमार्ग कारशेडबाबत या समितीने काय म्हटलं याचा अभ्यास करावा,” असं म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंना दिला ‘हा’ सल्ला!

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“लोकसभा निवडणूक एकहाती जिंकूच, पण विधानसभेतही आमचा विजय निश्चित”

कोरोनाचं पहिलं लसीकरण ‘या’ राज्यात होणार सुरु; आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

“टू मच डेमोक्रॉसी”, म्हणत उर्मिला मातोंडकरांची मोदी सरकारवर जोरदार टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या