Top News मनोरंजन

सुशांत आणि दिशा मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांचं अमित शहांना पत्र, म्हणाले

मुंबई | सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता 3 महिने उलटून गेले आहेत. तर सुशांतच्या अगोदर त्याची मॅनेजर दिशा सालियान हिने देखील आत्महत्या केली होती. या दोन्ही प्रकरणांवरून भाजपा आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलं आहे.

या पत्रात नितेश राणे म्हणतात, “दिशा सालियानसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असलेला पार्टनर रोहन रॉयला सुरक्षा देण्यात यावी. दिशाचा मृत्यू झाला त्यावेळी रोहन त्या ठिकाणी उपस्थित होता. त्यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणी रोहनचा जबाब महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे सीबीआयने देखील दिशाच्या होणाऱ्या नवऱ्याची चौकशी करावी. जेणेकरून दोन्ही मृत्यूंंमागील कारण स्पष्ट होण्यास मदत होईल.”

नितेश राणे पुढे म्हणाले, 8 जून आणि 14 जून रोजी काय घडलं याचा थेट संबंध लागतो. ज्या पार्टीमध्ये दिशा 8 जून रोजी गेली होती होती, तिथे तिच्याबरोबर काहीतरी गडबड झाली असावी असं माझं म्हणणं आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या जवळ असलेल्या रिया आणि अंकिताची चौकशी करण्यात आली. त्याचप्रमाणे रोहन रॉय दिशाच्या सर्वात जवळचा असून तो या प्रकरणात सर्वात महत्त्वाचा आहे.”

सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयद्वारे केला जात आहे. याशिवाय ईडी आणि एनसीबीकडूनही तपास चालू आहे. तर सीबीआय, एनसीबी आणि ईडीच्या चौकशीबद्दल राणे यांनी समाधान व्यक्त केलं.

महत्वाच्या बातम्या-

मराठा आरक्षणासाठी सरकार जे काही करेल त्याला आमचा पाठिंबा असेल- देवेंद्र फडणवीस

तज्ज्ञांशी संवाद सुरू असून मराठा आरक्षणाबाबत दोन दिवसांत निर्णय जाहीर करू- उद्धव ठाकरे

चिंताजनक! राज्यात आज 23 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नागपुरात 2 दिवसांचा जनता कर्फ्यू; अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या