राष्ट्रवादीच्या खासदाराला भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर

कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांना चक्क केंद्रात मंत्रिपदाची ऑफर देण्यात आलीय. इचलकरंजीचे भाजप आमदार सुरेश हाळवणकर यांनी ही ऑफर दिलीय. 

खासदार धनंजय महाडिक संसदेत सातत्याने कोल्हापूरच्या विकासासाठी पोषक प्रश्नांची मांडणी करत असतात. आपल्यासारख्या अष्टपैलू खासदाराची मोदींना गरज आहे. भाजपमध्ये या, तुम्हाला मंत्रिपद देऊ, असं हाळवणकर म्हणाले. भीमा कृषी, पशू प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

दरम्यान, खासदार धनंजय महाडिक यांनी मात्र हाळदणकर यांच्या ऑफरवर बोलणं टाळलं, मात्र कोल्हापुरात या ऑफरची चांगलीच चर्चा रंगलीय.