भाजपला राष्ट्रीय आप्पती समजून सत्तेतून हद्दपार करू- शरद पवार

मुंबई | घटनात्मक संस्थांवर हल्ले करून दुबळ्या करणाऱ्या भाजप सरकारला राष्ट्रीय आपत्ती समजून हद्दपार करण्याचं आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. ते शेतकरी हक्क परिषदेच्या कार्यक्रमात बोलत होते.

शेतकरी आणि शेती व्यवसाय संकटात आहे. आत्महत्यांची संख्या वाढत आहे. मात्र केंद्रातील व राज्यातील राज्यकर्त्यांना त्याबद्दल काडीचीही आस्था नाही, अशी टीका शरद पवारांनी केली.

भाजप राम मंदिराचा मुद्दा काढून समाजातील वातावारण कलुषित करत आहे, असं त्यांनी म्हटलं. 

दरम्यान, आगामी निवडणुकीत भाजपचा परावभव करण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. 

महत्त्वाच्या बातम्या-

-जिल्ह्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व पक्षांना उद्ध्वस्त करू!

-संघावर बंदी आणणं नेहरुंना जमलं नाही, राहुल गांधींनाही जमणार नाही!

-महाराष्ट्र औद्योगिक विकासात मागे का?; शिवसेनेचा सरकारला सवाल

-राम कदमांच्या नव्या व्हीडिओची चर्चा; सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल

-सत्तेशिवाय ‘मातोश्री’ची चुल पेटणार नाही- नारायण राणे