शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याआधीच भाजपकडून पेड ट्रेंडची तयारी???

मुंबई | शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत तोच भाजपने मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात ट्रेंड सुरु केल्याचं समोर आलंय. हा ट्रेंड आधीच निर्धारित होता तसेच तो पेड असल्याचा आरोपही केला जातोय. 

शेतकरी आपले प्रश्न घेऊन मुंबईत धडकल्यानंतर #KisanLongMarch हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होतो आहे. या हॅशटॅगला उत्तर देण्यासाठी भाजपने #KisanThanksDevendra हॅशटॅग सुरु केल्याचं कळतंय.

#KisanThanksDevendra हॅशटॅग वापरुन ट्विट पडण्यास सुरुवात झालीय. ही ट्विट पेड असून प्रत्येक ट्विटसाठी 5 रुपये दिले जात असल्याचा आरोप अनऑफिशिअल सुसुस्वामी हँडलवरुन करण्यात आलाय.