बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘राजीनामा देण्यासाठी भाजपने 5 कोटी रुपये दिले होते’; ‘या’ माजी आमदाराचं वक्तव्य

अहमदाबाद | आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी भाजपाने 5 कोटी रुपये दिल्याचे गुजरातमधील काँग्रेसचे तत्कालीन आमदार सोमाभाई पटेल यांनी मान्य केल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

गुजरात विधानसभेच्या आठ जागांसाठी होत असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या राज्यातील काँग्रेस नेत्यांनी सोमाभाई पटेल यांचे स्टिंग ऑपरेशन घडवून आणलं.

आमदारकीचा राजीनामा द्यावा म्हणून भाजपने मला पैसे दिले होते. नाही तर कारणाशिवाय आमदार आपल्या पदाचा राजीनामा का देईल?, असं सोमाभाई पटेल यांनी म्हटलंय.

याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे गुजरातमधील खासदार चंद्रकांत रघुनाथ पाटील यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची मागणी काँग्रेसने केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“मुंबई आमची आहे, मुंबईच्या वाट्याला जाऊ नका”

“एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?”

‘सतर्कतेने दिवाळीचं स्वागत करा’; इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन

“बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन”

…तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More