भाजपच्या पायाखालची वाळू सरकली, आता मुंबईचे नेतेही गुजरातच्या प्रचाराला!

मुंबई | गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर भाजपनं जोरदार प्रचार करायला सुरवात केलीय. मुंबईतील डझनभर भाजपचे नेते गुजरात निवडणुकीच्या प्रचारात उतरणार असल्याचं समजतंय.

सुरत भागात उत्तर भारतीय मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुंबईतील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी या भागात जाऊन प्रचार करणार असल्याचं समजतंय

गुजरात निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून 22 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला जेरीस आणण्याचं काम विरोधकांकडून होत आहे. त्यामुळे जोरदार प्रचारासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रचारात काहीही कमी न पडण्याची खबरदारी घेतली जातीय.