बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप होणार?

पाटना | महाराष्ट्रात भाजपने एकनाथ शिंदे(CM Eknath Shinde) यांच्या गटासोबत युती करून सत्ता स्थापन केली. परंतु बिहारमध्ये भाजपची(BJP) सत्ता धोक्यात आल्याच्या चर्चा आहेत. कारण बिहारमधील राजकीय वातावरण तापलं  आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप- जनता दल (जेडीयू) यांची यूती तुटण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिसतात युती तुटल्याची घोषणा जेडीयूकडून केली जाण्याची शक्यता आहे.

जेडीयू लवकरच आरजेडी, डावे आणि काॅंग्रेसलासोबत घेऊन ,सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. त्यासाठी जेडीयू प्रयत्न करत आहे. आरसीपी सिंह यांनी जेडीयूला रामराम ठोकला, यावरून भाजप पक्ष फोडण्याच काम करत आहे, असा आरोप जेेेेडीयूने भाजपवर केला आहे.

मंगळवारी पटणामध्ये आरजेडी आमदारांची बैठक होणार आहे. ही बैठक अधिक महत्वाची आहे, कारण जेडीयू- भाजपची युती तुटण्याची शक्यता आहे. आरजेडीच्या या  बैठकीला खासदारही उपस्थित राहणार आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत हे खासदार आणि आमदार पटणामध्ये दाखल होतील.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार(CM Nitish Kumar) हे काॅंग्रेसच्या(Congress) संपर्कात आहेत, अशी माहिती मिळाली आहेे. नितीश कुमार यांनी काॅंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी(Soniya Gandhi) यांची भेट घेतली आहे. गेल्या महिन्यापासून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात काही खटकल्याच्या चर्चा आहेत, त्यावेळीपासून भाजप आणि नितीश कुमार हे चारवेळा आमने सामने आले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचं सरकार कोसळणार अशा चर्चा आहेत.

थोडक्यात बातम्या-

पुणेरी पाटी पाहताच अमृता फडणवीसांना आठवले एकनाथ शिंदे, म्हणाल्या…

“…तर हे सरकारही जाऊ शकतं, तयारीला लागा”

‘बिग बॉस मराठी 4’ महेश मांजरेकर नाहीतर ‘हा’ अभिनेता होस्ट करणार?

अमित ठाकरेंची भाऊ आदित्य ठाकरेंवर टीका, म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा डिवचलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More