बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आव्हाड, तुम्ही सरळ तबलीग जमातीत सहभागी व्हा; भाजपची जहरी टीका

मुंबई |  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी 5 एप्रिलच्या रात्री लाईट घालवून दिवे पेटवण्याचं आवाहन केलं. या आवाहनानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर कडाडून टीका केली. त्यांच्या याच टीकेला आता भाजपचे प्रसाद लाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

सर्व जगाने म्हणजेच युनेस्को आणि WHO संस्थेनेसुद्धा ज्यांच्या कोरोनाविरुद्धच्या प्रयत्नांचे कौतुक केले त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरूद्ध बोलताना किंवा टीका करताना थोडी मनाची तरी बाळगा. जनाची सोडलीच असणार… तुम्ही सरळ तबलीग जमातीत सहभागी व्हा, असा बोचरा सल्ला आमदार प्रसाद लाड यांनी जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, अशी घणाघाती टीका आव्हाड यांनी मोदींवर केली होती. त्यांच्या या ट्विटला कोट करत प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे, “मूर्ख नसलेले जितेंद्र आव्हाड साहेब जरा गूगल करा आणि अर्थ बघा espirit de corps” मूळ फ्रेंच आहे शब्दप्रयोग. गूगल इंग्रजीत सांगेलच. नाहीच कळला तर म्हणून मराठीत सांगून ठेवतो. त्याचा अर्थ होतो ‘सहकार्याची किंवा एकजुटीची भावना…”

अर्थात मतदार संघातल्या विशिष्ट जमातीला खूष करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कसं समजणार सहकार्य किंवा एकजुटीची भावना? एक प्रसिद्ध वाक्य आहे ‘ स्वत:ची जो करे स्तुती, तो एक मुर्ख.’ ” मी मूर्ख नाही ” ही स्वत:ची स्तुतीच ना?, असाही टोला लाड यांनी आव्हाडांना लगावला आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार राम कदम यांनीही जितेंद्र आव्हाड यांना चांगलंच धारेवर धरत त्यांच्यावर जोरदार आसूड ओढले आहेत.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

“मोदी म्हणजे ‘बिग बॉस’, आठवड्यातून एकदा येऊन नवा टास्क देऊन जातात ”

मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्यांना सलील कुलकर्णीने खडसावलं, म्हणाला…

मुंबई विमानतळावर तैनात CISF चे 11 जवान कोरोना पॉझिटिव्ह

तब्लिगीमुळे 14 राज्य व्हेंटिलेटरवर; तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More