सातारा | कोरोनामुळे शेतकऱ्यांच्या आधीच्या उत्पादनाला फटका बसला होता. आता कुठे कांद्याचे भाव वाढले तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी वर्गात केंद्र सरकारविषयी संतापाची भावना आहे. यावर भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्र सरकारला एक सल्ला दिला आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेण्याचा सल्ला दिला आहे.
संपूर्ण देशाला अन्नधान्य आणि भाजीपाल्याची कमतरता भासू दिली नाही. आज जगभरात कांद्याला मोठी मागणी आहे, अशावेळी निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. हजारो टन कांदा निर्यातीसाठी पडून आहे. आज कांद्याला चांगला भाव मिळत असताना असा निर्णय घेणे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयबाबत आपण केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं उदयनराजे भोसलेंनी सांगितलं आहे.
केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा प्रस्ताव हा कोरोनाच्या संकटकाळात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्कादायक आहे. बाजारातील कांद्याच्या वाढत्या किमतींच्या आधारावर केंद्र सरकारने केलेली निर्यात बंदी ही शेतकऱ्यानां उद्ध्वस्त करणारी आहे. @PiyushGoyal pic.twitter.com/938qmNlC3p
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) September 15, 2020
महत्वाच्या बातम्या-
“आरोग्याची हमी मिळत नसेल तर कोणीही जीव धोक्यात घालणार नाही…”
“कोरोना तर काहीच नाही अजून 2 मोठी संकटं येणार”
“धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु”
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी शंख वाजवण्याचा सल्ला देणाऱ्या भाजप खासदाराला कोरोनाची लागण!
“हिंदी सिनेसृष्टीत घराणेशाही ही चंद्र, सूर्याइतकीच लख्ख आहे”