विरोधकांच्या ‘संविधान बचाव’विरोधात भाजपची तिरंगा रॅली!

मुंबई | विरोधकांच्या संविधान बचाव रॅली विरोधात भाजप तिरंगा रॅली काढणार आहे. दादरच्या वसंत स्मृती येथे आयोजित कार्यक्रमानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही घोषणा केली. 

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारची विकासकामे पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून भाजप आणि सरकारला बदनाम करण्याचा कट आखण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला. 

दरम्यान, सरकारच्या विरोधात विरोधकांकडून काढण्यात आलेला हल्लाबोल मोर्चा अपयशी ठरला असून त्याचा कोणताही परिणाम राज्यातील जनतेवर झाला नाही, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी यावेळी केला.