पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक काही दिवसांवर येऊ घातली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार तयारी सुरु केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. येत्या महिनाभर अधिकाधिक पात्र पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचून त्यांची नोंदणी करण्याची सूचना केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. पुणे जिल्ह्यातील ग्रामीणच्या सर्व तेरा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदारनोंदणी करून घेण्याची जबाबदारी मावळ तालुका भाजपाचे अध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्याकडे देण्यात आली.
यावेळी झालेल्या बैठकीस रावसाहेब दानवे यांच्यासह खासदार गिरीश बापट, खासदार डॉ.भागवत कराड, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश बवरे, धर्मेंद्र खांडरे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रवादीत प्रवेशाच्या चर्चा असतानाच एकनाथ खडसेंना शिवेसेनेकडून ऑफर
राजस्थानमध्ये बलात्कार झाला तेव्हा राहुल गांधी का गेले नाहीत- रामदास आठवले
‘रिया सुटली, भाजपची पाटी फुटली’; काँग्रेसचा भाजपला टोला
“भाजपच्या अनुकूल परिस्थितीत खडसेंनी पक्षाची साथ सोडू नये”
#Womenpower! अमृ्ता फडणवीसांचा खास लूक, ट्विट करत म्हणाल्या…
Comments are closed.