महाराष्ट्र मुंबई

भाजप मालामाल; तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाल्या इतक्या कोटींच्या देणग्या

मुंबई | सत्ताधारी भाजपवर कॉर्पोरेट विश्व चांगलंच मेहरबान झाल्याचं दिसत आहे. 2016 ते 2018 या कालावधीत भाजपला तब्बल 915.59 कोटी रूपये देणगी स्वरूपात मिळाले आहेत, अशी माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं प्रसिद्ध केली आहे.

विशेष म्हणजे भाजपला मिळालेल्या देणग्यांची रक्कम काँग्रेसला मिळालेल्या देणग्यांच्या तब्बल 16 पट आहे. 2016 ते 2018 या कालावधीत 1731 कॉर्पोरेट्सनी भाजपला 915.59 कोटी रूपये देणगी स्वरूपात दिले आहेत.

देशात सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसला केवळ 55.36 कोटींच्या देणग्या मिळाल्या आहेत. सर्वाधिक देणगी मिळणाऱ्या पक्षांच्या यादीत राष्ट्रवादी तिसऱ्या स्थानी आहे. त्यांना मिळालेल्या देणग्यांची रक्कम 7 कोटींहून जास्त आहे.

2017 आणि 2018 या आर्थिक वर्षांमध्ये देशातील 6 राष्ट्रीय पक्षांना एकूण 1059.25 कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत. यातील 93 टक्के देणग्या कॉर्पोरेट्सकडून आल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

-“सुजय विखेंनी निवडणुकीपुरता वापर करून फसवणूक केली”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या