Top News देश

सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही?; भाजपनं ‘हा’ मेसेज दिल्याची चर्चा

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तानाट्ट्याचा सस्पेन्स काही केल्या कमी होण्याचं नाव दिसत नाही. अशात भाजपमध्ये जाऊनही सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, असं समजतंय. भाजपने त्यांना यासंदर्भात मेसेज पाठवला असून आधी सरकार पाडण्यासंदर्भात सूचना केल्याचं बोललं जातंय.

सचिन पायलट यांना ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचं बोललं जात होतं, मात्र त्यातील ३ आमदारांनी पुन्हा जयपूरला परतत अशोक गेहलोत सरकारलाच आपला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे पायलट यांना आता २७ आमदारांचं पाठबळ असल्याचं बोललं जातंय.

भाजपनं सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिल्याची माहिती आहे. कारण राज्यातील नेतृत्त्वावरुन भाजपमध्ये खल सुरु आहे. वसुंधराराजे शिंदे यांच्या समर्थनार्थ ४५ आमदार आहेत.

दुसरीकडे सचिन पायलट यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे. त्या प्रयत्नांना यश येत असल्याचं देखील काँग्रेसकडून सांगितलं जात आहे. अशा परिस्थितीत पायलट काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन पायलट यांना मोठा धक्का; परतलेल्या 3 आमदारांचं धक्कादायक वक्तव्य

शरद पवारांनी एनडीएमध्ये येऊन नरेंद्र मोदींसोबत काम करावं, केंद्रीय मंत्र्याचं निमंत्रण

संजय राऊतांचं भाजपला ओपन चॅलेंज; “हिंमत असेल तर महाराष्ट्रात ‘हे’ करुन दाखवा!”

‘तुला मनसे सांगणं आहे…’, रूपाली पाटील यांनी केतकी चितळेला सुनावले खडे बोल

कार्यकारी अध्यक्ष होताच हार्दिक पटेलांनी केलं चुकीचं ट्विट, ट्रोल झाल्यावर केलं डिलीट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या