अनिल देशमुखांवरील हल्ला म्हणजे स्टंटबाजी, भाजपने ‘ते’ आरोप फेटाळले

BJP Rejects Allegations on Anil Deshmukh Attack

Anil Deshmukh Attack | महाराष्ट्रात विधानसभेची धामधूम सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख ( Anil Deshmukh Attack ) यांच्या कारवर सोमवारी रात्री हल्ला करण्यात आला. काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे.

हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांनी ‘भाजप जिंदाबाद’ अशा घोषणा दिल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ही घटना घडली तेव्हा देशमुख यांच्यासोबत कारमध्ये त्यांचे स्वीय सहाय्यक उज्ज्वल भोयर देखील होते. त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. मोठा दगड गाडीच्या समोरील काचावर फेकला गेला. यामुळे काचेला तडा गेला आणि त्यानंतर एक दगड थेट देशमुख यांच्या कपाळावर लागला. यावेळी हल्ला करणाऱ्यांनी ‘भाजप जिंदाबाद’ आणि ‘अनिलबाबू मुर्दाबाद’ अशा घोषणा देखील केल्या. घोषणा देऊन हल्लेखोर मोटारसायकलीवरून फरार झाले, असं उज्ज्वल भोयर म्हणाले आहेत.

तर, भाजपकडून हे आरोप फेटाळण्यात आले आहेत. भाजपाने ही ‘स्टंटबाजी’ आहे, असा आरोप केला आहे. स्वत:च्याच कार्यकर्त्यांकडून देशमुख यांनी दगडफेक घडवून आणली, असा आरोप भाजपाचे काटोल मतदार संघाचे प्रभारी अविनाश ठाकरे यांनी केलाय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री सव्वा 8 वाजता ही घटना घडली. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी अनिल देशमुख हे नरखेड येथे सभेत आले होते.सभा संपल्यावर कटोलकडे जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. 4 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर दगडफेक केली. (Anil Deshmukh Attack)

नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्याजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस आता तपास करत आहेत. या घटनेचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी एक्सवर याबाबत एक पोस्ट देखील लिहिली आहे.

सुप्रिया सुळे यांचा संताप

“प्रचार संपवून परत जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिलजी देशमुख साहेब यांच्यावर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. ‌ही अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक घटना आहे. आम्ही सर्वजण या हल्ल्याचा निषेध करतो. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने हल्ला करणारी मानसिकता या राज्यात कधीही नव्हती.”

“हे राज्य लोकशाही विचारांना मानणारे राज्य आहे. पण भाजपाच्या काळात राज्यातील विशेषतः नागपूर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा झाली असून गुंडांना मोकळे रान मिळाले आहे. या घटनेची सखोल चौकशी होऊन देशमुख साहेबांवर हल्ला करणारे हल्लेखोर आणि त्यांचे मास्टरमाईंड गजाआड झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे. पुन्हा एकदा या घटनेचा तीव्र निषेध,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. (Anil Deshmukh Attack)

News Title : BJP Rejects Allegations on Anil Deshmukh Attack

महत्वाच्या बातम्या –

अनिल देशमुखांवर हल्ला करणाऱ्यांकडून ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा?, नेमकं काय घडलं?

प्रेमविवाहाला संमती ते नोकरीच्या नव्या संधी.. आज ‘या’ राशींना ग्रहमान देतील साथ!

राजकारण गाजवणाऱ्या बड्या नेत्याने राजकीय संन्यासाची केली घोषणा!

रोहित पवारांना मिळणार मोठी जबाबदारी; शरद पवारांनी जाहीरच करून टाकलं

चंद्रकांत पाटलांचं कोथरूडकरांना आवाहन, म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .