भाजप सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने असेल तर मनेका गांधींना मंत्रिमंडळातून काढून टाकावं!

पुणे | भाजप सरकार जर शेतकऱ्यांच्या बाजूंचे असेल तर त्यांनी वाघाची बाजू घेणाऱ्या मनेका गांधी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं, अँसं शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील म्हणाले.

भाजपमध्ये कसलाही मेळ राहिलेला नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना त्यांनी प्राणीमित्रांच्या बाजूने बोलायला लावले आहे आणि इथले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत आहेत, असंही ते म्हणाले.

तसंच, सुधीर मुनगंटीवार हे जरी शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत असले तरी 13 लोक मारेपर्यंत ते गप्प का बसले होते, पहिला माणूस मारला तेव्हाच वाघ का मारला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, मनेका गांधी यांनी वाघिण मारल्यानंतर हळहळ व्यक्त केली होती, तसंच सुधीर मुनगंटीवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-उंदराचेही बरोबर आणि मांजराचेही बरोबर म्हणत भाजपवाले जनतेला मूर्ख बनवतायेत!

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम निवडणुकीसाठी करतोय असा प्रचार

-शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमचा निवडणुकीसाठी अर्ज दाखल

-…तर गांधी घराण्याच्या बाहेरील काँग्रेस अध्यक्ष करून दाखवा!

-नेहरूंमुळेच चहावाला पंतप्रधान झाला म्हणणाऱ्यांना मोदींचं उत्तर