बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: ‘त्या’ 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजपकडून अध्यक्षांना अर्ज

मुंबई | राज्य विधीमंडळाच्या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाला (Winter Session) आजपासून सुरूवात झाली. दरवर्षी नागपूरमध्ये होणारे अधिवेशन पहिल्यांदाच मुंबईत होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला.

म्हाडा व आरोग्य विभागातील पेपरफुटी प्रकरण, टीईटी, ओबीसी आरक्षण, एसटी कर्मचारी आंदोलन यासारख्या अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्यासाठी भाजप (BJP) सज्ज झालं आहे. या गोंधळादरम्यान 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी भाजपने अध्यक्षांकडे स्वतंत्र अर्ज दिला आहे.

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. या गोंधळानंतर 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) आदेशानंतर या आमदारांचं निलंबन मागे घेण्यासाठी भाजपने अध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे अर्ज दिला आहे.

आमदारांचे निलंबन मागे घेण्यासाठी विधीमंडळाच्या अध्यक्षाकडे स्वतंत्र अर्ज देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानूसार कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी प्रत्येक आमदाराने अध्यक्षांकडे स्वतंत्र अर्ज दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

थोडक्यात बातम्या-

Omicron: ‘..तर शाळा पुन्हा बंद होऊ शकतात’; वर्षा गायकवाड यांचं सूचक वक्तव्य

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विधानसभेत ‘इतके’ जण कोरोना पॉझिटीव्ह

हिवाळी अधिवेशन: पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक, विधान भवनाच्या बाहेर घोषणाबाजी

Omicron: विनामास्क वाहन चालवणं महागात पडणार; होणार ‘ही’ मोठी कारवाई

हिवाळी अधिवेशन: “…आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?” अजित पवार संतापले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More