बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या घोटाळ्याला भाजप जबाबदार’; नवाब मलिकांच्या आरोपाने पुन्हा खळबळ

मुंबई | राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे नेहमीच काहीना काही गौप्यस्फोट करत असतात. त्यामुळे ते नेहमीच कोणत्या न कोणत्या अडचणींमध्ये पहायला मिळतात. अशातच आता त्यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधल्याचं पहायला मिळालं.

राज्यभरात देवस्थानांच्या जमिनीचा घोटाळा सुरु आहे आणि या घोटाळ्याला भाजप नेते जबाबदार आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. यावेळी बीडमध्ये एकूण 513 एकर जमिनींचा घोटाळा झाल्याचा आरोप नवाबांनी केला आहे. यावरुन त्यांनी भाजपवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचंही नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं. आम्ही देवस्थाची जागा हडपणाऱ्यांविरोधात कारवाई करायला सुरुवात केली आहे. ज्या तक्रारी दाखल आहेत त्यांची चौकशी करुन गुन्हा दाखल करणार आहे, असा इशाराही मलिकांनी यावेळी दिला आहे.

दरम्यान, आज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी नवाब मलिक यांनी अनेक कागदपत्र सादर करत तपास यंत्रणा निष्पक्ष तपास करतील, अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

आबांच्या पाऊलावर पाय टाकत आहे, त्यामुळे काहींनी… – रोहित पाटील

पंतप्रधान मोदींचा प्रयागराज दौरा; ‘या’ लाभार्थींच्या खात्यात जमा करणार 20 कोटी रूपये

‘शिवाजी महाराज ओबीसी होते’; महादेव जानकरांचं वादग्रस्त वक्तव्य

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

MHADA पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; ‘या’ भाजप नेत्याला अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More