महाराष्ट्र मुंबई

‘भाजप’मुळेच युती रखडली- उद्धव ठाकरे

मुंबई | भाजपच्या राजकीय धोरणांमुळेच महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची युती लटकलेल्या अवस्थेत आहे, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. 

एकीकडे 43 जागा जिंकायचा निर्धार करायचा आणि दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेशी युती करण्याच्या गप्पा मारायच्या. एकदाच काय ते ठरवा, अशी ताकीदही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. 

2014 साली भाजपनेच युतीच्या अस्थिरतेची सुरुवात केली असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. सत्ता सगळ्यांना हवी असते पण सत्तेच्या नशेत राहणं योग्य नाही, अशी बोचरी टीकाही ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यातील 43 जागा भाजपच जिंकेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

राहुल गांधींना ‘आऊट’ करण्याची जबाबदारी माझ्यावर- रामदास आठवले

“मला बारामतीला बोलावता काय… मग येतोच मी”

-जो जातीचं नाव काढेन त्याला मी ठोकून काढेन- नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या