Top News देश

‘भारतात फेसबुकवर भाजप आणि आरएसएसचं नियंत्रण’; राहुल गाधींचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | आघाडीची सोशल मीडिया वेबसाइट फेसबुकबाबत प्रकाशित झालेल्या एका नव्या रिपोर्टनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर आणि आरएसवर निशाणा साधला आहे.

बजरंग दलावर कारवाई केल्यास फेसबुकच्या भारतातील व्यवसायावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे फेसबुकने बजरंग दलाबाबत नरमाईची भूमिका घेत बजरंग दलाला ‘धोकादायक संघटना’ मानण्यास नकार दिला असल्याचा दावा अमेरिकेच्या वॉल स्ट्रीट जर्नलच्या वृत्तपत्रात करण्यात आला. याचाच धागा पकडत राहुल गांधींनी निशाणा साधला आहे.

भाजप आणि आरएसएसचं भारतातल्या फेसबुकवर नियंत्रण आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलं आहे. यासंबंधीत गाधींनी ट्विट करत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी केलेल्या या गंभीर आरोपावर भाजप काय प्रत्युत्तर देत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“अण्णा हजारे शेतकरी आंदोलनात सहभागी होतील असं वाटत नाही”

“ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून तरी अमृता फडणवीस यांनी गाणं थांबवावं”

वर्षेभर “स्थगितीचे नकारात्मक” डीजे कोण वाजवतेय हे उघड झालंच ना?- आशिष शेलार

“शिवसेनेच्या चेहऱ्यावर जमलेल्या हिरव्या शेवळाची चिंता करा”

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण…-नितीन गडकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या